Skip to main content
2360.0₹ 1499.0

कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळाचा प्रतिबंध - कायदा आणि त्यापलीकडे (Advance Level)

POSH कायदा २०१३, वरील ऑनलाईन प्रमाणपत्र अभ्यासक्रम

महाराष्ट्र राज्य महिला आयोग

पॉश कायदा, २०१३ - कलम १९, कलम २४ (अ) आणि नियम १३(फ) अनुपालन अभ्यासक्रम

हा कोर्स अंतर्गत समिती सदस्य, संस्थांचे प्रमुख आणि उच्च व मध्यम व्यवस्थापन यांच्यासाठी उपयुक्त आहे.

  • वेळ : साधारण ७ तास
  • भाषा : मराठी
  • प्रशिक्षण अवधी - प्रशिक्षण सुरु केल्यापासून ३० दिवसांपर्यंत असेल.
  • व्हिडीओज
  • उपक्रम
  • स्वगत आणि अनुभव
  • प्रश्नोत्तरे
  • डाऊनलोड साहित्य
  • संदर्भ साहित्य
  • मोठ्या संस्थांसाठी देखील राबविण्यास, वापरण्यास आणि अंमलबजावणी करण्यास अत्यंत सोपे प्रशिक्षण.
Read less

हे प्रशिक्षण कशासाठी?

पॉश कायदा, २०१३ - कलम १९, कलम २४ (अ) आणि नियम १३(फ) चे अनुपालन करणारा,
राज्य सरकारद्वारा मान्यता प्राप्त एकमेव ऑनलाइन अभ्यासक्रम:

  • • प्रत्येक नियोक्ता जागरूकता कार्यक्रम आयोजित करू शकेल
  • • सदस्य आणि कर्मचार्यांच्या संवेदनशीलतेसाठी अनिवार्य प्रशिक्षण
  • • राज्य सरकारद्वारा मान्यता प्राप्त प्रशिक्षण मोड्यूल्स
  • • प्रशिक्षण संपल्यावर तुम्हांला एमएससीडब्ल्यू कडून प्रमाणपत्र मिळेल

हे प्रशिक्षण कोणासाठी आहे?

  • हे प्रशिक्षण अंतर्गत समिती सदस्य, संस्थांचे प्रमुख आणि उच्च व मध्यम व्यवस्थापन यांच्यासाठी उपयुक्त आहे.

या प्रशिक्षणातून तुम्ही काय शिकाल?

  • या प्रशिक्षणातून, आपण पुढील गोष्टी समजून घेऊ शकाल आणि शिकू शकाल:
  • • लैंगिक छळ आणि मानसिकता (लैंगिक छळामागील मानसिकता ओळखणं.)
  • • कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ (कामाच्या ठिकाणी होणारे लैंगिक छळ कशामुळे उद्भवू शकेल किंवा कोणती कृती लैंगिक अर्थाची असू शकेल)
  • • POSH कायदा आणि त्या अंतर्गत मार्गदर्शक सूचना (या कायद्याचा कसा आणि कुठे वापर करता येईल ते समजून घेणं.)
  • • परिणाम आणि प्रतिसाद – कायदा आणि कायद्याच्या पलिकडे (जे दीर्घकाळासाठी सुरक्षा, विश्वास आणि निष्पक्षतेची संस्कृती असलेले कार्यस्थान तयार करण्यात मदत करेल.)
  • • परिवर्तनाची भूमिका (कामाच्या ठिकाणी लैंगिक अत्याचार होऊ नये म्हणून आपल्यापैकी प्रत्येकजण काय भूमिका निभावू शकतो, हे समजून घेणं.)



वैशिष्ट्ये

  • • वेळ : साधारण ७ तास
  • • भाषा : मराठी
  • • प्रशिक्षण अवधी - प्रशिक्षण सुरु केल्यापासून ३० दिवसांपर्यंत असेल.
  • • व्हिडीओज
  • • उपक्रम
  • • स्वगत आणि अनुभव
  • • प्रश्नोत्तरे
  • • डाऊनलोड साहित्य
  • • संदर्भ साहित्य
  • • मोठ्या संस्थांसाठी देखील राबविण्यास, वापरण्यास आणि अंमलबजावणी करण्यास अत्यंत सोपे प्रशिक्षण.

अभ्यासक्रमाची माहिती

  • सध्या सर्वच क्षेत्रात - जसे की राजकारण, समाजकारण, व्यवसाय आणि इतर सर्व क्षेत्रात स्त्रिया, पुरुषांच्या बरोबरीने जरी काम करत असल्या तरी त्यांना स्त्री-पुरुष भेदभावाला सामोरे जावे लागते आणि त्यामुळे कामाच्या ठिकाणी लैंगिक छळाच्या घटना घडतात. प्रत्येक व्यक्तीचा – ‘सुरक्षित कामाचे ठिकाण’ हा घटनात्मक अधिकार आहे. त्यामुळे भारत सरकारने, ‘कामाच्या ठिकाणी महिलांवर होणारा लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई आणि निवारण) अधिनियम २०१३’ पारित केला जो POSH कायदा म्हणून ओळखला जातो. या कायद्याचे प्रत्येक संस्थेने / कंपनीने पालन करणे बंधनकारक आहे.

  • पुरुषप्रधान समाजात जिथे स्त्रिया असुरक्षित आहेत तिथे त्यांची असुरक्षितता लक्षात घेऊन POSH कायद्याच्या अंतर्गत, ‘महाराष्ट्र स्टेट कमिशन फॉर विमेन (MSCW)’ ने ‘PUSH – People United against Sexual Harassment’ हा उपक्रम हाती घेतला आहे. या संपूर्ण उपक्रमाचा हेतू आहे की - कामाचे ठिकाण आणि मग त्यातून भविष्यात एक असा समाज घडला जावा जिथे स्त्रियांना गौरवाने आणि आदराने वागवले जाईल. या उपक्रमांतर्गत, सरकारी कार्यालयातील आणि विद्यापीठातील जवळजवळ ४०,००० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले गेले आहे. या उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात शाळा आणि कॉर्पोरेट ऑफिसेसचादेखील समावेश केला जाईल.

  • Prevention of Sexual Harassment at Workplaces (POSH) या कायद्यानुसार, प्रत्येक संस्थेला आपल्या कर्मचाऱ्यांच्या प्रति संवेदनशील राहून प्रशिक्षित अशी अंतर्गत समिती स्थापन करणे बंधनकारक आहे. परंतु प्रत्यक्षात या गोष्टींची अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून आले आहे.

  • उच्च दर्जाचे ऑनलाइन प्रशिक्षण देणारे MSCW हे देशातील पहिले आयोग आहे. या प्रशिक्षणात एकसारखेपणा आणण्यासाठी आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी MSCW ने ‘श्यामची आई फौंडेशन, पुणे’ या संस्थेबरोबर, हे प्रशिक्षण देणारा, हा ऑनलाइन अभ्यासक्रम तयार केला आहे. या प्रशिक्षणामुळे कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळाला प्रतिबंध करण्यासाठी आणि त्या छळाच्या विरोधात योग्य ती कारवाई करण्यासाठी संस्थेला / कंपनीला योग्य ते मार्गदर्शन व माहिती मिळू शकेल. तसेच या प्रशिक्षणाचा उपयोग कामाच्या ठिकाणी सुरक्षितता, विश्वास आणि प्रामाणिकपणा ही मूल्ये रुजण्यासाठी होऊन लैंगिक छळाचे प्रमाण देखील कमी होऊ शकेल.

  • अत्याधुनिक धोरण असलेल्या उपयुक्त आणि माहितीपूर्ण अशा या ऑनलाईन प्रशिक्षणामुळे, या विषयाशी निगडीत सर्व व्यक्ती जसे की नियोक्ता, अंतर्गत समिती सदस्य आणि कर्मचारी इत्यादी घटकांपर्यंत ही चळवळ पोहोचेल आणि त्यामुळे ‘PUSH – People United against Sexual Harassment’ ही मोहीम – कामाचे ठिकाण आणि संपूर्ण समाज, ‘लैंगिक छळमुक्त’ होण्यासाठी हातभार लावेल.

For multiple users, view price plan

Enroll

Testimonials

Ayush Agrawal

Co-founder, Seniority Pvt. Ltd.

It was really eye-opening. The course is hard-hitting, thought provoking and really engaging, and because it was online it was really easy to access...It's a course that really made me question all the inherent biases that all of us
carry.

Dr. Nikhil Varude

CEO, Circadian Communications and Analytics

I have done 'n' number of courses, my employees have done 'n' number of courses. But what I found in this SAF's POSH course is that they have made it in a very interesting way. They tell each and every concept in a story form, in a case study form. They just don't throw legal mumbo-jumbo on you.

Sahil Deo

Co-founder, CPC Analytics

I must say that I was extremely impressed with this course, and before doing this I did not have a great understanding of this very important subject. I would definitely recommend this course. It is not a dry, legal course, but provides a lot of examples with a focus on the psychological aspects of prevention.

Experts Speak

Pradip Bhargava

President MCCIA

Vaishali Bhagwat

Advocate (Civil & Cyber Law)


For multiple users, view price plan